Operation Lotus : सरकार पाडून पक्षांतर केलेल्या 17 गद्दारांना मतदारांनी दाखवली लायकी; 'इतक्या' आमदारांचा पराभव

ऑपरेशन कमळ मोहिमेत गळाला लागलेल्या १७ आमदारांपैकी केवळ ६ जणांचा या विधानसभा निवडणुकीत विजय झाला आहे.
Karnataka Election Result
Karnataka Election Resultesakal
Summary

२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधित १०४ जागा मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे मग भाजपने काँग्रेस व धजदच्या असंतुष्ट आमदारांना गळाला लावले.

बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या २०१९ सालच्या ऑपरेशन कमळ (BJP Operation Lotus) मोहिमेत गळाला लागलेल्या १७ आमदारांपैकी केवळ ६ जणांचा या विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) विजय झाला आहे. तर एच. विश्‍वनाथ व रोशन बेग यांनी यावेळी निवडणूक लढविली नव्हती.

दावणगेरेचे आमदार आर. शंकर, तर विजयनगरचे आमदार व मंत्री आनंद सिंग यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. उर्वरित १३ जणांना भाजपने उमेदवारी दिली, पण त्यापैकी सात जणांचा पराभव झाला आहे. त्यात प्रामुख्याने विद्यमान आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, कृषीमंत्री बी. सी. पाटील, माजी मंत्री श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी यांचा समावेश आहे.

Karnataka Election Result
Sharad Pawar : एकेकाळी 9 आमदार, 2 खासदार असणाऱ्या बालेकिल्ल्याला भाजपनं पोखरलं; पवारांनी लक्ष्य घालण्याची गरज!

मतदारांनी दलबदलू आमदारांना शिकविला धडा

२०१८ साली यापैकी काही काँग्रेस तर काहीजण धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही १७ जणांपैकी १५ जण निवडून आले होते, तर दोघांचा पराभव झाला होता. २०२३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३ जणांना भाजपने उमेदवारी दिली होती, पण या निवडणुकीत मात्र सात मतदारसंघातील मतदारांनी दलबदलू आमदारांना धडा शिकविला आहे. ऑपरेशन कमळ राबविल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एच. विश्‍वनाथ व एम. टी. बी. नागराज यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विश्‍वनाथ यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती. त्यामुळे विश्‍वनाथ यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढविली नाही.

Karnataka Election Result
Karnataka Result : कर्नाटकात बड्या नेत्यांचा पराभव, प्रमुख नेत्यांनी मारली बाजी; जाणून घ्या कोण विजयी, कोण पराभूत?

मतदारांनी पुन्हा केला पराभव

एम. टी. बी नागराज यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला, तरी त्यांना भाजपने यावेळी व्हसकोटे मतदारसंघातून पुन्हा संधी दिली होती, पण मतदारांनी पुन्हा त्यांचा पराभव केला आहे. ऑपरेशन कमळमधील गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, यशवंतपूरचे आमदार एस. टी. सोमशेखर, के. आर. पूरचे आमदार बैराती बसवराज, महालक्ष्मी ले-आऊटचे आमदार के. गोपालय्या व राजराजेश्‍वरी नगरचे आमदार एन. मुनीरत्न हे विजयी झाले आहेत.

Karnataka Election Result
Karnataka Election Result : DK शिवकुमार तब्बल लाख तर माजी मंत्री गुंडुराव फक्त 105 मतांनी विजयी

राजकीय भवितव्य टांगणीला

२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधित १०४ जागा मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे मग भाजपने काँग्रेस व धजदच्या असंतुष्ट आमदारांना गळाला लावले. दोन्ही पक्षाचे मिळून १७ आमदार गळाला लागले. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यातील बहुतेकजण पोटनिवडणुकीत विजयी झाले. काहीना मंत्रिपद मिळाले, तर काहींची महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. मात्र, पक्षांतर केलेल्या १७ जणांच्या विरोधातील रोष यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बाहेर पडला. सात जणांना त्याचा फटका बसला. शिवाय आता त्यांचे राजकीय भवितव्यही टांगणीला लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com