Nipani Election : शरद पवारांच्या उमेदवारानं दाखवली खिलाडूवृत्ती; पराभवानंतर उत्तम पाटलांनी केलं जोल्लेंचं..

निवडणुकीत माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांचा विजय झाला. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
Nipani Assembly Constituency
Nipani Assembly Constituencyesakal

निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघातून (Nipani Assembly Constituency) मी पहिली विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीचा निकाल आला. त्यामध्ये मला क्रमांक 2 ची मतं मिळाली. तब्बल ६६, ०५६ मतदारांनी मला पसंती दर्शवली.

नवखा उमेदवार, नवखा पक्ष असूनही फार चांगला प्रतिसाद आपण सर्वांनी दिला. मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. माझे राजकीय जीवन समृध्द करण्यासाठी या निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा मला नक्कीच होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील (NCP candidate Uttam Patil) यांनी व्यक्त केलं.

Nipani Assembly Constituency
Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांसमोर शक्तीप्रदर्शन करत देसाईंनी दाखवली ताकद; ताफ्यावर 50 जेसीबीतून फुलांचा वर्षाव

उत्तम पाटील म्हणाले, 'निवडणुकीत सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार, सहकारी, प्रचारक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मतदारसंघातील सर्वच बंधू-भगिनी आणि आबालवृद्ध, नागरिक व मतदारांनी माझ्या उमेदवारीसाठी कष्ट घेतले. उन्हातान्हाची पर्वा न करता माझे काम अधिकाधिक लोकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवण्यासाठी मदत केली. त्याचाच परिणाम म्हणून मतदारांनी एवढी भरभरून मते मला दिली.'

Nipani Assembly Constituency
Karnataka Election Result : 34 वर्षांनंतर काँग्रेसनं पुन्हा घडवला इतिहास; 1989 मध्ये तब्बल 178 जागांवर विजय

आपण सर्वांनी माझ्यासाठी खूप सारे कष्ट घेतले. त्यामुळेच प्रस्थापितांविरोधात लढाईसाठी मला बळ मिळाले. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. अपयश पचविण्यासाठीही ताकद लागते ती ताकद म्हणजेच आपण दिलेला प्रतिसाद आहे. यानंतरच्या येणाऱ्या सर्वच निवडणुकीत अधिक जोमाने आपण लोकांकडे कौल घेण्यासाठी जाऊ. येणाऱ्या सर्व निवडणुकांत सर्वसामान्य जनसेवेप्रती समर्पित कार्यकर्त्यांना बळ देऊ, असंही ते म्हणाले.

Nipani Assembly Constituency
Karnataka Election : म.ए समितीच्या उमेदवारांचा मोठा पराभव; मराठी भाषिकांनी 'सीमाप्रश्नी' घेतला महत्वाचा निर्णय

निवडणुकीत माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांचा विजय झाला. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे राबलेल्या सर्व हातांना सलाम आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. या पुढील काळातही सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पाठीशी राहून आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासह आपल्या समस्या सोडण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचेही उत्तम पाटील यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com