Karnataka Election : म.ए समितीच्या उमेदवारांचा मोठा पराभव; मराठी भाषिकांनी 'सीमाप्रश्नी' घेतला महत्वाचा निर्णय

गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) अनेक चढ-उतार पाहिले आहेत.
Maharashtra Ekikaran Samiti
Maharashtra Ekikaran Samitiesakal
Summary

समितीने कधीही निवडणूक हे आपले ध्येय ठेवले नसून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे हेच समितीचे मुख्य ध्येय आहे.

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी याचा कोणताही परिणाम सीमालढ्यावर होणार नाही.

आगामी काळात सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार मराठी भाषिकांतून केला जात आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे.

सीमालढ्याचा एक भाग म्हणून समितीने आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कधी यश तर कधी अपयश मिळाले आहे. मात्र, मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची जिद्द थोडीही कमी झालेली नाही. यावेळी प्रत्येक मतदारसंघात समितीने एकच उमेदवार दिला होता, तरीही समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडून समितीला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Maharashtra Ekikaran Samiti
Sharad Pawar : एकेकाळी 9 आमदार, 2 खासदार असणाऱ्या बालेकिल्ल्याला भाजपनं पोखरलं; पवारांनी लक्ष्य घालण्याची गरज!

मात्र, समितीने कधीही निवडणूक हे आपले ध्येय ठेवले नसून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे हेच समितीचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे निवडणुकीतील पराभवामुळे आलेली निराशा दूर सारुन पुन्हा एकदा समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Maharashtra Ekikaran Samiti
Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांसमोर शक्तीप्रदर्शन करत देसाईंनी दाखवली ताकद; ताफ्यावर 50 जेसीबीतून फुलांचा वर्षाव

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी. साक्षी पुरावे नोंदविण्याच्या कामाला सुरुवात व्हावी याकडे समितीने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला यापूर्वीही निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, समिती किंवा येथील मराठी भाषिक कधीही लढ्यापासून दूर गेलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पराभवामुळे आलेली मरगळ झटकून नव्याने लढ्यासाठी उभे राहावे. कार्यकर्त्यांनी निराशा झटकून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करून घेण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे मत व्यक्त होत आहे.

Maharashtra Ekikaran Samiti
Karnataka Election Result : 34 वर्षांनंतर काँग्रेसनं पुन्हा घडवला इतिहास; 1989 मध्ये तब्बल 178 जागांवर विजय

महाराष्ट्र एकीकरण समिती सीमालढ्याचा एक भाग म्हणून निवडणूक लढवत असते. आगामी काळात अधिक जोमाने आणि ताकदीने सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज झाले पाहिजे. समितीने आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे समितीचे कार्यकर्ते खचून जात नाहीत. उलट अधिक जोमाने कार्य करतात, हे लवकरच दिसून येईल.

-मालोजी अष्टेकर, सरचिटणीस, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com