Karnataka Election : शामनूर सर्वाधिक वयाचे तर दर्शन ठरले सर्वात तरुण आमदार; जाणून घ्या दोघांचं वय

नंजनगुड विधानसभा मतदारसंघातून २८ वर्षांच्या तरुणाने काँग्रेसकडून (Congress) विजयी होत सर्वात कमी वयाचे आमदार ठरले आहेत.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023esakal
Summary

दर्शन ध्रुवनारायण (Darshan Dhruvanarayan) यांनी विजय मिळवत सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश करणार आहेत.

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेत २२४ आमदार निश्चित झाले आहेत. यात सर्वाधिक ९१ वयाचे आमदार शामनूर शिवशंकराप्पा (Shamanur Shivashankarappa) ठरले आहेत. एवढ्या वयातही त्यांनी दावणगेरे उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली. त्यांचा मुलगा मल्लिकार्जून यांनीही निवडणूक लढविली.

शामनूर हे लिंगायत समाजाचे (Lingayat Community) प्रभावी नेते आहेत. या वेळी त्यांना रोखण्यासाठी भाजपने कसरत केली; पण शामनूर यांना रोखणे शक्य झाले नाही. ते आता या निवडणुकीत विधानसभेत सर्वात जास्त वयाचे आमदार ठरले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या विधानसभेतही शामनूर हेच सर्वात ज्येष्ठ आमदार होते.

Karnataka Election Result 2023
Jayant Patil : 'पृथ्वीतलावर माझ्या नावे घरच नाही! रात्री शांत झोप लागते, ED ला सामोरे जायला तयार'

नंजनगुड विधानसभा मतदारसंघातून २८ वर्षांच्या तरुणाने काँग्रेसकडून (Congress) विजयी होत सर्वात कमी वयाचे आमदार ठरले आहेत. दर्शन ध्रुवनारायण (Darshan Dhruvanarayan) यांनी विजय मिळवत सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश करणार आहेत. दर्शन यांचे वडील ध्रुवनारायण यांनी आपल्या मतदारसंघात तयारी करून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती.

Karnataka Election Result 2023
Karnataka Election : 'ही दोस्ती तुटायची नाय..'; आमदारकीपासून दूर असलेले सवदी, कागे पुन्हा विधानसभेत

दरम्यान, त्यांचे निधन झाल्याने काँग्रेसची उमेदवारी दर्शन यांना मिळाली. त्यातून दर्शन यांनी विजयी होत सर्वात कमी वयाचा आमदार होण्याचा मान मिळविला. वडिलांच्या निधनानंतर दर्शन यांची आई यांचेही महिन्यातच निधन झाले होते. त्यामुळे सहानुभूतीच्या आधारवर दर्शन यांचा विजय सोपा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com