Prajwal Revanna Jail Job : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) याच्यावर तुरुंगात एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो सध्या बंगळूर येथील पैरप्पाना अग्रहरी कारागृहात (Parappana Agrahara Prison) लायब्ररी क्लर्क म्हणून काम करणार असून, त्यासाठी त्याला दररोज ५२२ रुपयांचे मानधन मिळणार आहे.