

Karnataka Dress Code
ESakal
कर्नाटक सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने (DPAR) एक परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयात फाटलेल्या जीन्स आणि स्लीव्हलेस कपडे घालण्यास मनाई आहे. या आदेशामागील कारण सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिष्ठा राखणे असल्याचे सांगितले आहे. आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा धोका देखील आहे.