

Karnataka government khadi mandate
ESakal
कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सिद्धरामय्या सरकारने खादी कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्यातून एक दिवस खादी कपडे घालणे बंधनकारक आहे. मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी खादी कपडे घालणे अनिवार्य असेल. ही योजना २४ एप्रिलपासून लागू केली जाईल.