कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

९२,५२५ कर्जदार शेतकरी
५६,०११.१३ लाख कर्जाची रक्कम
४६,६१४.६७ लाख माफ होणारे व्याज

बंगळूर - अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या थकीत कृषी कर्जावरील व्याज माफ करण्याचा आदेश बी. एस. येडियुराप्पा सरकारने शनिवारी (ता. १५) जारी केला. मात्र, त्यासाठी ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करण्याची अट घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून घेतलेल्या थकीत कृषी कर्जावरील व्याज माफ करण्याचा आदेश राज्य सरकारने शनिवारी जारी केला. ३१ जानेवारी २०२० पर्यंत मध्यम व दीर्घ मुदतीचे कृषी कर्ज प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

‘नागरिकत्व’, ‘३७०’बाबत फेरविचार नाही

त्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज सरकारने माफ केले आहे. अतिवृष्टी व अनावृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ, जिल्हा मध्यवर्ती बॅंका, लॅंम्प्स सोसायटी व पिकार्ड बॅंकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka government made a big decision for the farmers