राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Karnataka New CM Oath: मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी तीन वाजता राजीनामा देणार आहेत. दरम्यान, राज्यपाल थावरचंद गहलोत हे कौटुंबिक कारणास्तव बुधवारी रात्री अचानक बाहेर गेले असल्यानं नवा पेच निर्माण झालाय.
Karnataka New CM Oath

Siddaramaiah resignation Governor absent

Esakal

Updated on

Karnataka New CM: कर्नाटकात काँग्रेसने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा केलीय. सिद्धरामय्या दुपारी तीन वाजता राजीनामा देणार आहेत. दरम्यान, राज्यपालच राज्यात नसल्यानं नवा पेच निर्माण झालाय. राज्यपाल थावरचंद गहलोत हे कौटुंबिक कारणास्तव बुधवारी रात्री अचानक बाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा कसा देणार? राजीनामा कोण मंजूर करणार आणि नव्या मुख्यमंत्र्‍यांना शपथ कोण देणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे लोकभवनाकडून सिद्धरामय्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली नसल्याचं सांगण्यात आलंय. Siddaramaiah to Resign Today, But Karnataka Governor Away: Questions Over New CM Oath

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com