Karnataka coastal districts heavy rain alert
esakal
बंगळूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला (Yellow alert for 23 districts in Karnataka) असून, खबरदारीचा उपाय म्हणून २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि किनारपट्टीच्या भागांत पावसाचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.