Karnataka IAS Officer Gyanendra Kumar Gangwar Missing
esakal
कर्नाटकातील वरिष्ठ IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कुटुंबीयांसह इतर कोणाशीही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे गंगवार यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.