esakal | भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर, माजी मंत्री पाटील यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर, माजी मंत्री पाटील यांचा खुलासा

भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर, माजी मंत्री पाटील यांचा खुलासा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भाजपमध्ये प्रवेशासाठी पैशाची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. श्रीमंत पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे.

श्रीमंत पाटील यांच्या दाव्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मला कल्पना नाही. पण, पैशाची ऑफर देण्यासाठी कोण आले होते याचा खुलासा माजी मंत्री पाटील यांनी करावा, असे त्यांनी म्हटले आहे. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी शनिवारी (ता. ११) एका कार्यक्रमात काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करताना पैशाची ऑफर होती. पण, ती ऑफर मी नाकारल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत रविवारी अथणीतील एका कार्यक्रमात सवदी यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी श्रीमंत पाटील यांचे वक्तव्य नेमके काय अर्थाने होते, हे मला माहीत नाही, असे सांगितले. पण, त्यांचा विषय माझ्या कानावर आला आहे. परंतु, ऑफर कुणी दिली व पैसे देण्यासाठी कोण आले होते, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

राज्यात काँग्रेस-धजद पक्षाचे सरकार असताना माजी मंत्री रमेश जारकीहोळींसह १७ जणांनी भाजपात प्रवेश केल्याने युती सरकारचे पतन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक होऊन त्यात श्रीमंती पाटील विजयी झाले. त्यांना वस्त्रोद्योग मंत्रिपदही देण्यात आले. परंतु, अलीकडे राज्यात नेतृत्व बदल झाल्याने पाटील यांचे मंत्रिपद गेले. तेव्हापासून पाटील यांच्याकडून मंत्रीपदासाठी पाठपुरावा सुरु आहे. मराठा समाजाच्या प्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी होत आहे.

आरोपांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी

माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी भाजपमध्ये सामील होण्यासाठी पैशाची मोठी ऑफर देण्यात आली होती असे म्हटले आहे. या आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रसेने केली आहे.प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ‘‘भाजपने त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी पैशाची ऑफर दिली होती. यावरून कॉंग्रेस व धजदच्या १७ आमदारांना भाजपने अवैध पैसा देऊन विकत घेतल्याचे स्पष्ट होते,’’ असे गुंडूराव यांनी म्हटले आहे. आमदारांना विकत घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार म्हणजे अनधिकृत अपत्य आहे. आमदारांच्या खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशाचा स्रोत कोणता? असा त्यानी ट्विटरवर प्रश्न केला आहे.

loading image
go to top