सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढल्यास हल्ला करू, मुस्लीम महिलांना धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Burqa Controversy

सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढल्यास हल्ला करू, मुस्लीम महिलांना धमकी

बंगळुरू : कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा बुरख्यावरून वाद (Karnataka Burqa Controversy) रंगताना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा हिजाब काढल्यास मुस्लीम मुली आणि महिलांवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी सोशल मीडियावरून दिली जात आहे. याबाबतचे मेसेज देखील व्हायरल होत आहेत. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

हेही वाचा: 'बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय'

'मुस्लिम डिफेन्स फोर्स' नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुपवरून हा मेसेज देण्यात आला आहे. ''बुरखा घातलेल्या काही मुली मॉलच्या तळघरांमध्ये गैरवर्तन करताना दिसल्या. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी इशारा दिला आहे. हे पुन्हा दिसल्यास तुम्हाला मारहाण केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी सेल्फी किंवा फोटोसाठी बुरखा काढू नये. अन्यथा त्यांच्यावर हल्ला केला जाईल'' असे मेसेज या ग्रुपवरून व्हायरल करण्यात आले आहेत.

हा व्हॉट्सअॅप ग्रुप स्वतः मुस्लिम हक्कांचे संरक्षण करत असल्याचा दावा करत असून त्यांनी सोशल मीडियावरून पालकांना धमक्या दिल्या आहेत. आम्ही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असं मंगळुरूचे पोलिस आयुक्त शशी कुमार यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांच्या मुलांनी सेल्फी आणि चित्रांसाठी सार्वजनिक ठिकाणी त्यांचा बुरखा काढू नये. नाहीतर मुस्लीम गटाच्या सदस्यांकडून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असा सल्ला पोलिसांनी पालकांना दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाबवरून वातावरण तापलं होतं. हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असा निकाल दिला होता. त्यानंतर मुलींनी फक्त परीक्षेसाठी हिजाब घालून परवानगी द्या, अशी विनंती केली. पण, महाविद्यालयानं हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला देखील प्रवेश दिला नाही.

Web Title: Karnataka Muslim Whatsapp Group Threaten To Woman Not Removing Burqa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnataka
go to top