पाण्याशिवाय ५ बाटल्या दारू पिऊ शकतो...! तरुणाने मित्रांसोबत पैज लावली; नंतर घटाघट प्यायला अन्...
Karnataka News: कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात १०,००० रुपयांच्या दारूच्या चॅलेंजमुळे २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कार्तिक नावाच्या एका तरुणाने त्याच्या मित्रांसोबत पाच बाटल्या दारू पाण्याशिवाय पिण्याची पैज लावली होती.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांनी एक दहा हजार रुपयांची पैज लावली होती. पाच बाटल्या दारू प्यायल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे कार्तिक असे आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,