Karnataka Politics : भाजप, धजदचे 35 आमदार लवकरच काँग्रेस पक्षात; उद्योग मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात पुन्हा खळबळ

पाटील यांच्या या विधानाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.
Karnataka Politics MB Patil
Karnataka Politics MB Patil esakal
Summary

माजी मुख्यमंत्री आणि धजद नेते एचडी कुमारस्वामी यांनी डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी १९ धजद आमदारांचा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

बंगळूर : कर्नाटकच्या राजकारणात (Karnataka Politics) मोठ्या बदलाचे संकेत असून, धजदचे १० आणि भाजपचे २५ आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होतील, असा दावा काँग्रेस मंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांनी केला आहे. कर्नाटकात भाजप काँग्रेसच्या पाच आमदारांनाही आकर्षित करू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, श्री. पाटील यांच्या या विधानाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. धजदचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचा दावा अनेक काँग्रेस नेत्यांनी केल्यानंतर पाटील यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले.

Karnataka Politics MB Patil
Gram Panchayat Results : कोल्हापुरात 29 ग्रामपंचायतींत सत्तांतर; 'इतक्या' ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मारली बाजी, नेत्यांच्या गटांची काय अवस्था?

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास जेडीएसच्या १९ आमदारांना पाठिंबा देईन, या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या विधानावर पाटील यांनी, ‘हे नाटकीय विधान असून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे’, असा आरोप केला. काँग्रेस पक्षात कोणताही संभ्रम नाही. आमचे पाच आमदार कुमारस्वामी यांच्याशी संधान बांधून नाहीत; उलट विरोधी पक्षातील सुमारे २०-२५ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा पाटील यांनी केला.

Karnataka Politics MB Patil
Gram Panchayat Results : सांगलीत महाविकास आघाडीला 38, महायुतीला 33 गावांत सत्ता; खासदार पाटील, गोपीचंद पडळकरांच्या गटांची काय अवस्था?

जर भाजपने आपल्या एका सदस्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे २५ आमदार आमच्या पक्षात सामील होतील. आमच्या पक्षाचे एकूण आमदार १५०-१६० होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आणि प्रभावी विरोधी पक्षनेता नेमण्याच्या भाजप सदस्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Karnataka Politics MB Patil
Satish Jarkiholi : कर्नाटकातील राजकारणाला वेगळं वळण; सिद्धरामय्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? काँग्रेस हायकमांड घेणार अंतिम निर्णय!

मुख्यमंत्री होण्याची घाई नाही - शिवकुमार

सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजी, तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि धजद नेते एचडी कुमारस्वामी यांनी शनिवारी डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी १९ धजद आमदारांचा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, ‘मला त्या पदावर येण्याची घाई नाही. आम्ही सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो. आपल्याला सुशासन देण्याची गरज आहे. मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. पक्षनेतृत्वापुढेही आपण मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com