Karnataka Accident: तिरुपतीहून परतताना काळाचा घाला, दोन मुलं अन् वडिलांसह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Seven Killed In Two Road Accidents In Karnataka: कोलार व चिक्कबळ्ळापूरमध्ये दोन भीषण अपघात; तिरुपतीहून परतणाऱ्या कुटुंबातील चौघांसह सात जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
Karnataka Accident News Seven Dead In Two Crashes In Kolar And Chikkaballapur Tirupati Return Journey Ends In Tragedy

Karnataka Accident News Seven Dead In Two Crashes In Kolar And Chikkaballapur Tirupati Return Journey Ends In Tragedy

sakal

Updated on

बंगळूर : कोलार आणि चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांत झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला. कोलार जिल्ह्यात तिरुपतीचे दर्शन घेऊन बंगळूरकडे परतणारी मोटार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. दुसऱ्या अपघातात फुलांच्या काढणीच्या कामासाठी जात असलेल्या मजुरांच्या मोटारीला कॅन्टरने धडक दिल्याने तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे १२ जण जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com