Hijab Controversy: कर्नाटकातील शाळा सोमवारी होणार सुरू ; बोम्मई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आवाहन केले आहे.
basavaraj bommai
basavaraj bommaisakal

बेंगलोर: कर्नाटकमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब संदर्भातील (Hijab Controversy) वाद आता कोर्टामध्ये गेला आहे. यासंदर्भात आज हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने सर्व शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु दोन्ही बाजूंनी कोणताही धार्मिक ड्रेस कोड पाळू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी शिक्षकांना एकत्र काम करण्याचे आणि महाविद्यालयांमध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकात (Karnataka) सोमवारपासून दहावीपर्यंचे वर्ग पुन्हा सुरू होणार असून महाविद्यालये थोड्या दिवसात सुरु होतील अशी माहितीही बसवराज बोम्मई यांनी दिली.

कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Issue In Karnataka) प्रकरणा नंतर बेंगळुरूमधील शैक्षणिक संस्थांभोवती कलम १४४ लागू करण्यात आले असून, पुढील दोन आठवडे शैक्षणिक संस्थांच्या २०० मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. नव्याने जारी करण्यात आलेले आदेश आजपासून लागू करण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com