विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिले PUBG गेम कसा खेळावा...

Karnataka Student Fails Exam After He Writes How To Play PUBG Games In Answer Sheet
Karnataka Student Fails Exam After He Writes How To Play PUBG Games In Answer Sheet

बंगळूरः एका विद्यार्थ्याने पबजी गेम डाउनलोड कसा करावा आणि कसा खेळावा, याबद्दलची माहिती उत्तर पत्रिकेमध्ये लिहीली. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण न मिळाल्याने त्याला अनुतीर्ण व्हावे लागले आहे. विशेष म्हणजे तो विद्यार्थी गेल्यावर्षी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण प्रथम आला होता.

पबजी गेमच्या आहारी जाण्यापूर्वी तो विद्यार्थी प्रत्येक विषयात विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होत होता. पबजी गेममुळेच आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकत नव्हतो. पबजी गेमच्या आहारी एवढा गेलो होतो की परीक्षा जवळ आली आहे, याचे लक्षातही नव्हते, अशी कबुली विद्यार्थ्याने दिली आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनीही अनेकदा त्याला मोबाइलबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्याने मित्रांशी चॅट करत असल्याचे सांगितले होते. विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाने मुख्याधापकांकडे यासंबंधी तक्रार करत त्याच्या पालकांशी चर्चा करण्याच ठरवले. विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला आहे.

‘मी अभ्यासात खूप हुषार होतो, पण पबजी गेममुळे आहारी गेलो. अनेकदा मी गेम खेळण्यासाठी वर्गातून दांडी मारत जवळच्या बागेत जाऊन खेळत असे. परीक्षेदरम्यान मला स्वत:चा राग आला होता म्हणून मी पबजी गेमसंबंधी लिहिले. आता माझ्या पालकांनी मोबाइल काढून घेतला आहे, पण अजूनही माझ्या डोक्यात विचार सुरु आहेत. हा गेम किती धोकादायक आहे हे मला आता कळत आहे,' असे विद्यार्थ्याने सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी यापूर्वी उत्तर पत्रिकेत वेगवेगळ्या कहाण्या, गाणी लिहिल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, गेम कसा डाऊनलोड करावा व तो कसा खेळावा हे उत्तर पाहून शिक्षकही हैराण झाले आहेत. यामुळे अनेकजण पबजी गेमच्या किती आहारी गेले आहेत, हे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com