कर्नाटकात आणखी शिथिलता येणार; Unlock - 3 संदर्भात उद्या बैठक

आवश्यक वस्तूंच्या खरेदीची वेळ वाढवण्याबरोबरच रात्रीच्या संचार बंदीची वेळ कमी होण्याची शक्यता
कर्नाटकात आणखी शिथिलता येणार; Unlock - 3 संदर्भात उद्या बैठक

बंगळूर : राज्यातील कोरोना (covid-19) संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूच्या प्रमाणातही मोठी घट होत आहे. यासाठी येत्या पाच जुलैपासून जारी करण्यात येणाऱ्या अनलॉक-३ (unlock -3) ची घोषणा करण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शनिवारी (३) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविली असून लॉकडाउन (lockdown) आणखी शिथिल करण्यावर चर्चा होणार आहे.

आवश्यक वस्तूंच्या खरेदीची वेळ वाढवण्याबरोबरच रात्रीच्या संचार बंदीची वेळ कमी होण्याची शक्यता आहे. कांही अटींसह मंदिरेही सुरू केली जाऊ शकतात. राज्यातील म्हैसूर, कोडगू, दक्षिण कन्नड जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्याचप्रमाणे कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्यानुसार मुख्यमंत्री लॉकडाउन पुन्हा अधिक शिथील करण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात आणखी शिथिलता येणार; Unlock - 3 संदर्भात उद्या बैठक
Success Story:दुबईच्या मार्केटमध्ये सांगलीचा ड्रॅगन; पाहा व्हिडिओ

सध्या बंद असलेले मॉल, चित्रपटगृहे, पब, बार, क्लब आदी ग्राहकांच्या ५० टक्के मर्यादेसह सुरू करण्यास अनुमती देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. सध्या बारमध्ये पार्सल घेऊन जाण्याची परवानगी आहे. तिसऱ्या अनलॉक दरम्यान बारमध्येच बसून मद्यपान करण्यास परवानगी मिळू शकते. सध्या खरेदीची वेळ पाचपर्यंत आहे. त्याचा कालावधी रात्री सातपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चित्रपट गृहे ५० टक्के प्रेक्षकांच्या मर्यादेसह सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com