Vande Mataram Karnataka Order
esakal
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं राज्यातील शासकीय कार्यक्रम आणि अधिकृत समारंभांमध्ये ‘वंदे मातरम’ची केवळ पहिली दोन कडवी गायली जावीत, असा आदेश जारी केला (Karnataka Vande Mataram order) आहे. मात्र, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राज्यपाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसह केंद्र सरकारशी संबंधित कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ची सर्व सहा कडवी पूर्णपणे गायली जाणार आहेत.