Karnataka Vidhansabha : सत्तांतर की पुन्हा कमळ? कर्नाटकात उद्या मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.१०) मे रोजी मतदान होणार असून शनिवारी (ता.१३) रोजी मतमोजणी होईल.
Karnataka Congress Campaign
Karnataka Congress Campaignsakal
Summary

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.१०) मे रोजी मतदान होणार असून शनिवारी (ता.१३) रोजी मतमोजणी होईल.

बंगळूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नितीन गडकरी, राजनाथसिंह आणि स्मृती इराणी यांच्यासारख्या बड्या मंत्र्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला तर काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडल्या.

धर्मनिरपेक्ष जनता दलानेही (जेडीएस) या निवडणुकीत बऱ्यापैकी ताकद लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता बुधवारी (ता.१०) मे रोजी मतदान होणार असून शनिवारी (ता.१३) रोजी मतमोजणी होईल. राज्यामध्ये सत्तांतर होऊन काँग्रेसची सत्ता येते की भाजपचे सिंहासन कायम राहते? याचा फैसला शनिवारीच होईल.

भाजपचा प्रचार

  • डबल इंजिनच्या सरकारमुळे झालेला विकास

  • रद्द केलेले मुस्लिम आरक्षण

  • हनुमंताच्या अवमानाचा मुद्दा

  • वादग्रस्त चित्रपट ‘दि केरळ स्टोरी’

  • काँग्रेसच्या नेत्या सोनियांची विषकन्येशी तुलना

काँग्रेसचा प्रचार

  • वाढती महागाई अन् बेरोजगारी

  • बजरंग दलावर बंदीचे आश्वासन

  • खर्गेंकडून पंतप्रधानांची विषारी सापाशी तुलना

  • अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याचे आश्वासन

  • जनतेच्या पैशांचा कथित अपहार

मोदींचा असाही झंझावात

मागील सात दिवसांच्या झंझावाती प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन हजारांपेक्षाही अधिक लोकांपर्यंत थेट पोचल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मोदींनी या माध्यमातून जुने आणि नवे कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला असून मोदींच्या रोड शोला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे भाजपने म्हटले आहे.

सोनियांना निवडणूक आयोगाची नोटीस

कर्नाटक रणधुमाळीमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी राज्याच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगानेही याची गंभीर दखल घेत सोनियांना नोटीस बजावली. सोनियांनी ‘सार्वभौमत्व’ या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर केला असून यामागे तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा आहे, असा दावा भाजपने केला.

मुस्लिम आरक्षण घटनाबाह्य असून त्यांना आरक्षण देण्यासाठी काँग्रेस कुणाचे आरक्षण कमी करणार आहे? लिंगायत की वोक्कलिग? राज्यघटना धर्मावर आधारित आरक्षणाला मान्यता देत नाही. कर्नाटकमध्ये भाजप बहुमताने सरकार स्थापन करेल. प्रत्येक भागामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

धनाचा वापर करून माणसे फोडून सरकारे बनविली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवले पाहिजे. ही ४० टक्के काय भानगड आहे हे कळेना. कर्नाटकची आजवर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली आहे. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते पण तसे कर्नाटकात झाल्याचे दिसत नाही.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

भाजप, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी मंत्री यांना मी थेट आव्हान देते की, त्यांनी कोणत्याही भागामध्ये जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवून दाखवावी. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगू नका, चाळीस टक्क्यावाल्या भाजप सरकारने कर्नाटकचे १.५ लाख कोटी रुपये का लुटले? बेरोजगारी, महागाई का वाढली?

- प्रियांका गांधी वद्रा, काँग्रेसच्या सरचिटणीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com