मंत्रिमंडळातील प्रभावी सदस्य पराभूत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

बंगळूर - विधानसभा निवडणुकीतून काही धक्कादायक निकाल बाहेर पडले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील अनेक प्रभावी मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

बंगळूर - विधानसभा निवडणुकीतून काही धक्कादायक निकाल बाहेर पडले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील अनेक प्रभावी मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

समाज कल्याण खात्याचे मंत्री एच. अंजनेय यांचा दारुण पराभव झाला. भाजपचे चंद्रप्पा यांनी होळल्केरे मतदारसंघातून त्यांच्याविरुद्ध सहज विजय संपादन केला. बागलकोट जिल्ह्याच्या तेरदाळमधून उमाश्री, धारवाडातून विनय कुलकर्णी, कलघटगीमधून संतोष लाड, दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बंटवाळमधून बी. रामनाथ रै या मंत्र्याचा दारुण पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे टी. नरसिंहपूर मतदारसंघातून बांधकाम मंत्री एच. सी. महादेवप्पा यांचाही पराभव झाला. सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील एक प्रभावी मंत्री म्हणून ओळखण्यात येणारे कायदा खात्याचे मंत्री टी. बी. जयचंद्रा यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. प्रमोद मध्वराज यांचा उडपी मतदारसंघात पराभव झाला. वाहतूक खात्याचे मंत्री एच. एम. रेवण्णा यांचाही पराभव झाला. गुलबर्गा जिल्ह्यातील सेडममधून डॉ. शरणप्रकाश पाटील, माजी मंत्री अभयचंद्र जैन (मोडविद्री) यांचाही पराभव झाला आहे.

Web Title: karnataka vidhansabha election result BJP Congress JDS Politics