Karnataka Crime News
esakal
विजापूर (कर्नाटक) : अनैतिक प्रेमसंबंधातून (Love Affair) घडलेल्या एका भयंकर प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवली आहे. एका महिलेनं आपल्या पतीचा खून करण्याचा कट रचला होता. या कटात तिचा बॉयफ्रेंड आणि त्याचा मित्र सहभागी झाले होते. मात्र, पतीच्या प्रसंगावधानामुळे हा कट फसला आणि या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. पतीला ठार करायचं होतं, पण उलट बॉयफ्रेंडच (Boyfriend) मृतावस्थेत सापडला.