
कर्नाटकात नेतृत्व बदल? हिजाबपासून कंत्राटदार आत्महत्येचा वाद
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पदभार स्वीकारून केवळ नऊ महिने झाले आहे. तरी राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज लिंगायत नेते बीएस येडियुरप्पा यांच्या जागी त्यांना मुख्यमंत्री बनवले होते. हिजाबच्या वादापासून (Hijab controversy) ते कंत्राटदाराच्या आत्महत्येपर्यंतचा (Contractor suicide) मुद्दा न हाताळल्याने बोम्मई यांना हटवण्याचा विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपच्या सूत्रांनी असा कोणताही नाट्यमय बदल नाकारला आहे. (Karnataka will have a change of leadership again)
गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या आजच्या बंगळुरू दौऱ्यामुळे या अटकळांना अधिकच उधाण आले आहे. बोम्मई यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असून लवकरच तो होऊ शकतो. भाजपचे शक्तिशाली मानले जाणारे सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या विधानाने या अटकळांना आणखीच खतपाणी घातले आहे.
हेही वाचा: म्हैस शोधण्यासाठी गेलेल्या आई, मुलींचे मृतदेहच परतले; बुडून मृत्यू
भाजपने (BJP) दिल्ली आणि गुजरातमध्ये मोठे बदल दाखवून दिले आहेत. यावरून राज्य पातळीवर संपूर्ण नेतृत्व बदलण्याची हिंमत पक्ष नेतृत्वात असल्याचे दिसून येते असे बी. एल. संतोष म्हणाले होते. संतोष यांच्या वक्तव्यामुळे बदलाच्या अटकळांना जोर आला आहे. संतोष यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मी असे म्हणत नाही की हे सर्वत्र होईल. परंतु भाजप असे निर्णय घेण्यास सक्षम आहे. जे इतर पक्ष घेत नाहीत. पक्षाचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीमुळे असे निर्णय घेणे शक्य होते. गुजरातमध्ये जेव्हा मुख्यमंत्री बदलले, तेव्हा एकाच वेळी मंत्रिमंडळ बदलण्यात आले. राज्याच्या नेतृत्वात नवखेपणा आणण्यासाठी हे केले गेले. त्यामागे कोणतीही तक्रार नव्हती. राजकारणात बदल महत्त्वाचा असतो.’’
दुसऱ्यांदा सत्तेत येणे सोपे नाही. सत्ता कोणाची असो त्यांना पुन्हा निवडणूक जिंकण्याचे आव्हान असते. त्यांना सत्ताविरोधी कारभाराचा सामना करावा लागतो, असे बी. एल. संतोष म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कदाचित वर्षभरातच कर्नाटकात पुन्हा नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा कोणत्याही टिप्पणीवर बोम्मईकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा: राहुल गांधींच्या दौऱ्यावरून वाद वाढला; विद्यार्थी पोहोचले हायकोर्टात
भाजपच्या निवडणुकीच्या भवितव्यावर परिणाम?
गेल्या दोन आठवड्यांपासून बोम्मई मंत्रिमंडळ फेरबदलाची तयारी करीत होते. त्याचवेळी मंत्र्यांवर परिषदेत स्थान मिळावे यासाठी ही अफवा मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून पसरवली जात असल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या वादांमुळे २०२३ मध्ये भाजपच्या निवडणुकीच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, असे सर्वोच्च नेतृत्वाचे मत आहे.
Web Title: Karnataka Will Have A Change Of Leadership Again Hijab Controversy Contractor Suicide Amit Shahs Tour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..