Karnataka local body election schedule 2026
esakal
बंगळूर : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग येण्याची शक्यता (Karnataka Panchayat Elections) आहे. आधी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका घेऊन त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. लोकप्रतिनिधींविना कार्यकाळ पूर्ण झालेल्या जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला डिसेंबरमध्ये सुरुवात करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असल्याची माहिती आहे.