कर्नाटकने सोडला काँग्रेसचा 'हात'; भाजपचे कमळ फुलले

bjp
bjp

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून प्रतिष्ठेची बनविलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य हिसकावून घेतले. भाजपने 114 जागांवर आघाडी मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालातून कर्नाटकमध्ये मोदी लाट टिकून असल्याचे स्पष्ट झाले. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असेल असे चित्र होते. पण, भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वांनाच मागे टाकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. 

कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली. मात्र, नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले. जेडीएसची भूमिका महत्त्वाची असेल असे वाटत असतानाच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झाले. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी यापूर्वीच आमचेच सरकार स्थापन होईल असा दावा केला होता. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजप 114, काँग्रेस 62, आणि जेडीएस आणि इतर 44 जागांवर आघाडीवर आहेत.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी 70 टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढत होती. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक होता. किनारपट्टीच्या भागात भाजपने पूर्णयपणे वर्चस्व मिळविल्याचे पहायला मिळत आहे. तर, कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या असलेल्या लिंगायत समाजाची मते भाजपलाच गेली असल्याचे पहायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एका ठिकाणाहून आघाडीवर आणि एका ठिकाणी पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com