इव्हीएममुळे भाजपची आणखी एक जागा कमी

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निकालामुळे भाजपचे संख्याबळ 104 वरून 103 वर आले आहे.

हुबळी : हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातील निकाल जाहीर करण्यात आला होता. तेथे भाजपचे जगदीश शेट्टर यांना विजयी घोषित केले होते. पण, एका इव्हीएम मशिनमध्ये झालेले मतदान व प्रत्यक्षात नोंदलेले मतदान यात फरक दिसून आला. त्यामुळे तेथे इतर उमेदवारांच्या आक्षेपाची दखल घेऊन या मतदारसंघातील घोषित निकाल रद्द करून मतमोजणी राखून ठेवण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निकालामुळे भाजपचे संख्याबळ 104 वरून 103 वर आले आहे.

दक्षिणेचे महाद्वार असलेल्या कर्नाटकमधील मंगळवारचा दिवस मोठ्या राजकीय उलथापालथींचा ठरला, कर्नाटक दिग्विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने शंभरी पार केली खरी; पण त्यांनाही बहुमताचा 112 हा जादुई आकडा गाठता आला नाही. नेमकी हीच संधी साधत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलास (जेडीएस) पाठिंबा देत देवेगौडापुत्र कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली. गोवा, मणिपूरमधील हिशेब चुकता करण्यासाठी कॉंग्रेसने पहिली खेळी खेळत भाजपला कोंडीत पकडले. यानंतर सायंकाळी कुमारस्वामी, येडियुरप्पा या दोघांनीही सत्ता स्थापनेचा दावा केला.

Web Title: #KarnatakaVerdict Hubli-Dharwad central result cancelled BJP setback