#Karunanidhi करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चेन्‍नई: दक्षिण भारताच्या राजकारणातील पितामह व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी दर्शनस्थळावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.

चेन्‍नई: दक्षिण भारताच्या राजकारणातील पितामह व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी दर्शनस्थळावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.

करुणानिधींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजाजी हॉलमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक महिला व पुरुषाचा सामावेश आहे. शेनबेगन (वय 60) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून, पुरुषाचे नावे समजू शकलेले नाही. सध्या पोलिस आणि समर्थकांकडून गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली.

Web Title: Karunanidhi death Two killed 30 injured at chennai