करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा वाद न्यायालयात

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

करुणानिधी यांचे काल (मंगळवार) चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी द्रमुककडून मरीना बिच या जागेची मागणी केली जात आहे.

नवी दिल्ली : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. द्रमुक पक्षाकडून मरीना बिच येथील जागेत अंत्यसंस्कार केले जावेत, अशी मागणी केली. मात्र, राज्य सरकारने ही जागा देण्यास नकार दिल्याने हा वाद मद्रास उच्च न्यायालयात गेला आहे. यावर सध्या सुनावणी सुरु असून, याबाबतचा निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे.

करुणानिधी यांचे काल (मंगळवार) चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी द्रमुककडून मरीना बिच या जागेची मागणी केली जात आहे. मात्र, सध्या सत्तेत असलेल्या तमिळनाडूतील पलानीस्वामी सरकारने ती जागा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता न्यायालयात सुनावणी सुरु असून, न्यायालयाच्या निकालानंतरच करुणानिधी यांच्यावर कोणत्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येईल, हे स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Karunanidhi Funeral Land Dispute in Court