करूणानिधींचे अंत्यविधी मरीना बीचवरच, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

करुणानिधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) चेन्नईतील मरिना बीच जागा निवडली. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. मात्र, सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे डीएमकेने उच्च न्यायालयात धाव घेतलील होती.

चेन्नई : डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी मरीना बीचवरील जागेची मागणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर करूणानिधींचे अंत्यविधी हे मरीना बीचवरच होतील, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. चेन्नईतील मरिना बीच येथील अण्णा स्मृतिस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे नेते एम. करूणानिधींचे काल (ता. 7) संध्याकाळा कावेरी रूग्णालयात निधन झाले. तमिळनाडूच्या जनमनावर राज्य करणाऱ्या एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून आज सकाळी आठ वाजल्यापासून मद्रास उच्च न्यायलयात सुनावणी सुरू होती. 

करुणानिधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) चेन्नईतील मरिना बीच जागा निवडली. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. मात्र, सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे डीएमकेने उच्च न्यायालयात धाव घेतलील होती.

'करुणानिधी यांच्या पार्थिवावर त्यांच्या राजकीय गुरुच्या स्मृतिस्थळाशेजारीच अंत्यसंस्कार करू द्यावेत,' असा भावनिक युक्तिवाद डीएमकेने न्यायालयासमोर मांडला. अण्णा द्रमुकने तत्कालिन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अंत्यसंस्कारावेळी नियमांची पायमल्ली केल्याचा युक्तिवादही डीएमकेने न्यायालयात केला.

Web Title: karunanidhi last ritual at marina beach madras high court decision