#Karunanidhi करुणानिधींची प्रकृती स्थिर - पलानीस्वामी 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जुलै 2018

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी करुणानिधींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आजच कावेरी रुग्णालयात एम. करुणानिधींची भेट घेतली. भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, करुणानीधींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

चेन्नई - तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी करुणानिधींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आजच कावेरी रुग्णालयात एम. करुणानिधींची भेट घेतली. भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, करुणानीधींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

दरम्यान, करुणानिधी हे 96 वर्षाचे आहेत. वयोमानानुसार, त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना कावेरी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येत आहे, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

करुणानिधींना ताप आणि संसर्ग वाढत चालला होता. करुणानिधी यांच्या किडनीला इन्फेक्शन झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून चेन्नईतील गोपालपूरम या त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर आणि परिचारिकांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. परंतु, आता त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्याचबरोबर, त्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि कावेरी रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणाबाहेर गर्दी केली आहे.

Web Title: Karunanidhi Is Stable Now says palaniswami