Vijay Thalapathy Video : ''मुख्यमंत्रीजी, जर तुम्हाला बदलाच घ्यायचा असेल तर, मला.." ; विजय थलपतींचं थेट आव्हान!

Vijay Thalapathy Challenge to CM Stalin : अभिनेता विजयने करूर चेंगराचेंगरी दुर्घटनेवर पहिल्यांदाच मौन सोडत, व्हिडिओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Actor Vijay Thalapathy reacts strongly to the Karur stampede tragedy, challenging Tamil Nadu CM Stalin.

Actor Vijay Thalapathy reacts strongly to the Karur stampede tragedy, challenging Tamil Nadu CM Stalin.

esakal

Updated on

Vijay Thalapathy reaction on Karur tragedy : तामिळनाडूमधील राजकीय पक्ष तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) नेते आणि अभिनेता विजय थलपती यांनी करूरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक व्हिडिओ जारी करत त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या समर्थकांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

विजय यांनी म्हटले आहे की, त्यांना या घटनेचा खूप धक्का बसला आहे. तसेच, योग्य ठिकाणं कशी निवडली गेली आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिस विभागाकडून परवानगी कशी मागितली गेली,  परंतु तरीही एक दुर्दैवी घटना घडली. हे देखील विजय यांनी सांगितलं आहे.

विजय यांनी त्यांच्या समर्थकांप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर दिला आणि सांगितले की, त्यांनी घटनेला राजकीय स्वरूप येऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली आहे. त्यांनी मान्य केले की या घटनेचा सर्वांवर खोलवर परिणाम झाला आहे आणि त्यांनी आश्वासन दिले आहे की, चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचार मिळत आहेत आणि ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा आहे

Actor Vijay Thalapathy reacts strongly to the Karur stampede tragedy, challenging Tamil Nadu CM Stalin.
Karur stampede case Update : तामिळनाडूतील करूर चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलपतींवर गंभीर आरोप!

याचबरोबर विजय थलपती यांनी या घटनेविरोधात बोलणाऱ्या राजकीय पक्षांवर जोरदार टीकाही केली आणि म्हटले की, ते जवळपास पाच महिन्यांपासून प्रचार दौरे करत आहेत. तसेच त्यांनी विश्वासही व्यक्त केला की, सत्य लवकरच सर्वांसमोर येईल आणि त्यांच्या पक्षाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही.

याशिवाय विजय थलपती पुढे म्हणाले, "मीही एक माणूस आहे. जेव्हा इतके लोक प्रभावित झाले आहेत, तेव्हा मी त्यांना सोडून कसा परत येऊ शकतो? मी गेलो नाही कारण मला खात्री करायची होती की अशी अप्रिय घटना पुन्हा घडणार नाही. आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये प्रचार केला, मग करूरमध्येच हे का घडले? हे कसे घडले? लोकांना सत्य माहीत आहे आणि ते सर्व काही पाहत आहेत."

Actor Vijay Thalapathy reacts strongly to the Karur stampede tragedy, challenging Tamil Nadu CM Stalin.
Arattai App Founder Sridhar Vembu : अब्जोंची संपत्ती तरीही छोट्या गावात सर्वसाधारण जीवन जगणारा अवलिया!

याचबरोबर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना आव्हान देत, विजय थलपती यांनी त्यांच्या समर्थकांऐवजी स्वतःला समोर केले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय, जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल, तर मला जे काही करायचे आहे ते करा. त्यांना हात लावू नका. मी घरी असेन किंवा माझ्या कार्यालयात असेन, माझ्याबरोबर हवं ते करा."

तसेच, त्यांनी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या चुकीच्या कृतीचे आरोप फेटाळून लावले. "आम्ही याशिवाय काहीही चुकीचे केले नाही. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. तरीही, पक्षाचे नेते, मित्र आणि सोशल मीडिया युजर्सची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट केली जात आहेत.’’ असं विजय थलपती म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com