Kashmir Cloudburst : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (शनिवार) सकाळी रियासी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीनंतर मोठे भूस्खलन (Reasi landslide) झाले. माहोर परिसरातील एका घरावर कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली एकाच कुटुंबातील सात सदस्य गाडले गेले. दुर्दैवाने, या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तासांपर्यंत बचावकार्य सुरू होते.