श्रीनगर - नववर्षातही काश्मीर खोऱ्यातील थंडीची तीव्रता कायम आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा अजूनही गोठणबिंदूखाली असून येत्या काही दिवसांत त्यात फारशी सुधारणा न होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे, रहिवाशांना हुडहुडी भरविणाऱ्या थंडीपासून अद्याप दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.
यंदाच्या हिवाळ्यात काश्मीरमध्ये तापमान गोठणबिंदूखाली गेल्याने हाडे गोठविणारी थंडी पडली आहे. या थंडीमुळे रात्र गोठविणारी असली तरी दिवसाचे तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे. कोरडे हवामान व बर्फवृष्टी न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीनगरमध्ये तर दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा आठ अंशांनी अधिक होते.
जम्मू आणि काश्मीरची हिवाळी राजधानी असलेले जम्मू शहर काही दिवसांपासून श्रीनगरपेक्षा थंड आहे. जम्मूत बुधवारी (ता. १०) कमाल तापमान नऊ अंश सेल्सिअस इतके होते. ते सामान्यापेक्षा नऊ अंश सेल्सिअसने कमी होते. काश्मीर खोऱ्यात सध्या सर्वाधिक थंडीचा ‘चिलाई कलान’ हा ४० दिवसांचा हंगाम सुरू आहे. हा हंगाम येत्या ३१ तारखेला संपेल.
प्रमुख ठिकाणचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
श्रीनगर - उणे ५
काझीगुंड - उणे ४.६
गुलमर्ग - उणे ३.५
पहलगाम - उणे ६.३
कोकेरनाग - उणे २.४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.