काश्मीरात पूराचा धोका ; नद्यांनी ओलांडल्या धोक्याची पातळी

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसाची माहिती देण्यात येत आहे. दक्षिण काश्मीरातील संगमसह श्रीनगरच्या राम मुंशी बाग येथील पाण्याच्या पातळीत आज (शनिवार) सकाळी वाढ झाल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील अधिकाऱ्यांनी सांगितले, की झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

जम्मू : काश्मीरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून, दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये पूराचा धोका असल्याचे सांगण्यात आले. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येथील झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसाची माहिती देण्यात येत आहे. दक्षिण काश्मीरातील संगमसह श्रीनगरच्या राम मुंशी बाग येथील पाण्याच्या पातळीत आज (शनिवार) सकाळी वाढ झाल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील अधिकाऱ्यांनी सांगितले, की झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तसेच यामुळे पूराचा धोका असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 

या परिसरात 21 फुटांपर्यंत पाण्याची ओलांडली जाऊन पूर येण्याची शक्यता असल्याचे सिंचन आणि पूर नियंत्रण विभागाने सांगितले.  

Web Title: Kashmir on flood alert after river water crosses danger mark, schools closed as precaution