काश्‍मिरमधील सोशल मिडियावरील बंदी हटविली

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग साईटसवर असलेली बंदी शुक्रवारी हटविण्यात आली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग साईटसवर असलेली बंदी शुक्रवारी हटविण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काश्‍मिरमध्ये असलेल्या अशांत परिस्थितीमुळे सोशल मिडियावर बंदी आणली होती. काही देशविरोधी घटकांकडून सोशल मिडियाचा गैरवापर करून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोचविण्यात आल्याने काश्‍मिरमध्ये सोशल मिडियावर बंदी आणली होती. दरम्यान काश्‍मिरमधील जनतेला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी सोशल मिडियावरील बंदी हटवावे असे आवाहन संयुक्त राष्ट्रातील तज्ज्ञांनी भारत सरकारला केले होते. या पार्श्‍वभूमीवर सरकारने फेसबुक, ट्‌विटर, व्हॉटसऍप सह एकूण 22 संकेतस्थळे आणि ऍप्सवरील बंदी हटविली होती. याशिवाय राज्यातील 3G आणि 4G सेवाही सुरू केल्या आहेत.

Web Title: kashmir news social media ban lifeted jammu kashmir whatsapp facebook twitter