दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सोपोरमध्ये चार पोलिस जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये पोलिसांच्या पार्टीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस गंभीर जखमी झाले.

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये पोलिसांच्या पार्टीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस गंभीर जखमी झाले.

बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पार्टीवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ल्याकरिता स्फोटकांचा वापर केला. सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचा कसून तपास करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: kashmir news terror attack four police injured