पुलवामा हल्ल्याप्रकरणी आठ युवक ताब्यात; एनआयए घटनास्थळी

सोनाली शिंदे
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

हल्ल्याचे नियोजन "जैशे महंमद'चा पाकिस्तानी म्होरक्‍या कामरान याने केल्याचा संशय असून, तो पुलवामा, अवंतिपुरा आणि त्राल या विभागांत सक्रीय आहे. त्राल जवळच्या मिदुरा येथे या आत्मघाती हल्ल्याचा आराखडा तयार केला गेल्याचा प्राथमिक चौकशीतील अंदाज आहे. स्फोटके पुरविणाऱ्या आणखी एका म्होरक्‍याचाही पोलिस शोध घेत आहेत.

श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी आठ ते दहा युवकांना ताब्यात घेतले. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतिपुरा जिल्ह्यांतील आहेत. दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

हल्ल्याचे नियोजन "जैशे महंमद'चा पाकिस्तानी म्होरक्‍या कामरान याने केल्याचा संशय असून, तो पुलवामा, अवंतिपुरा आणि त्राल या विभागांत सक्रीय आहे. त्राल जवळच्या मिदुरा येथे या आत्मघाती हल्ल्याचा आराखडा तयार केला गेल्याचा प्राथमिक चौकशीतील अंदाज आहे. स्फोटके पुरविणाऱ्या आणखी एका म्होरक्‍याचाही पोलिस शोध घेत आहेत. 

दरम्यान, हल्ला झालेल्या जम्मू-श्रीनगर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी पोचले असून, तपासणी सुरु आहे. परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmir police eight youth arrested for Pulwama terror attack