PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 1 January 2021

2021 च्या पहिल्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे

नवी दिल्ली- 2021 च्या पहिल्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान मोदींची प्रसिद्धी वाढली आहे. जगातील नेत्यांची त्यांच्या कार्यकाळात मिळणाऱ्या स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या अमेरिकेतील मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेनुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 55 टक्के स्वीकृतीसह जगातील सर्व नेत्यांच्या पुढे आहेत. 

पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांशी संबंधीत 72 कोटींच्या मालमत्तेवर टाच

मॉर्गिंग कंसल्टच्या सर्वेनुसार, 75 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे. दुसरीकडे 20 टक्के लोकांनी त्यांना नाकारले आहे. त्यामुळे त्यांची एकूण मान्यता रेटिंग 55 टक्के राहिली. पंतप्रधान मोदी जगातील अन्य नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांची मान्यता रेटिंग 24 टक्के आहे. प्रसिद्धी वाढणाऱ्यांमध्ये मॅक्सिकोचे अध्यक्ष अँड्रू मॅन्यूयल लोपेझ ऑबरॅडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट जॅक्सन यांचा समावेश आहे. ऑबरॅडोर यांना 29 टक्के मान्यता मिळाली, तर जॅक्सन यांना 27 टक्के मान्यता मिळाली. 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची मान्यता रेटिंग नकारात्मक राहिली आहे. याचा अर्थ त्यांचं समर्थन देणाऱ्यांपेक्षा त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मॉर्निंग कंसल्टनुसार, भारतात सर्वेक्षणादरम्यान 2126 लोकांची मतं जाणून घेण्यात आली होती. 

मोठी बातमी: अजित पवार यांनी पुणेकरांना दिलं नववर्षाचं गिफ्ट; वाचा सविस्तर

मॉर्गिंग कंसल्टने जगातील 13 देशांमधील नेत्यांबाबत सर्व्हे घेतला होता. ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जापान, मॅक्सिको, साऊथ कोरिया, स्पेन, यूके, अमेरिका या देशातील नेत्यांचा सर्व्हेसाठी विचार करण्यात आला होता. 

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून सुद्धा येथे कोरोना रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी राहिली. तसेच मृत्यूदरही भारतात कमी होता. पंतप्रधान मोदी यांनी भारत जगाला लस पुरवण्यास सक्षम असल्याचं वक्तव्य केलं होतं. महामारीच्या काळात मोदींची लोकप्रियता वाढली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM narendra Modi approval ratings highest among world leaders