काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं वर्चस्व? हिंदू-शिख कर्मचाऱ्यांना हवीय बदली

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं वर्चस्व? हिंदू-शिख कर्मचाऱ्यांना हवीय बदली
ANI
Summary

काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून बिगर मुस्लिम लोकांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे. यामुळे इथल्या अल्पसंख्यांकामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून बिगर मुस्लिम लोकांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे. यामुळे इथल्या अल्पसंख्यांकामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. एका बाजुला केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकार निर्वासितांना आश्रय देण्याची चर्चा करत आहेत. मात्र दहशतवाद्यांच्या नव्या कारवायांनी पुन्हा एकदा खोऱ्यातून बाहेर जाण्यास सुरुवात झाली आहे. प्राध्यापक आणि व्यावसायिकांवर झालेल्या हल्ल्यांनतर शीख आणि काश्मिरी पंडित समुदायातील लोक जम्मूला परत येत आहेत. याठिकाणी बिगर मुस्लिमांची संख्या जास्त आहे. शिक्षकांसह इतर सरकारी कर्मचारीसुद्धा जम्मूमध्ये परत येत आहेत. काहींनी खोऱ्यातून बाहेर बदली मागितली आहे. याशिवाय अनेकांनी सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमुळे कामावर जाणं बंद केलं आहे.

श्रीनगरमध्ये शिक्षण विभागात कनिष्ठ सहायक असलेले सुशील हे शुक्रवारी अचानक जम्मूला परतले. त्यांनी म्हटलं की, आम्ही काश्मीरवरून दुचाकीने इकडे परत आलो. श्रीनगरमध्ये एका शीख महिला मुख्याध्यापिकेची आणि काश्मिरी हिंदू शिक्षकाची हत्या झाल्यानंतर तिथे परिस्थिती बिघडली आहे. सुशील यांनी सांगितलं की, काश्मिरच्या रस्त्यावर जेव्हा आम्ही चालतो तेव्हा एकच मनात येतं की, जो कोणी आमच्याकडे पाहिल तो आमच्यावर गोळीबार करेल.

जम्मूला परत येणाऱ्यांना एकच चिंता आहे ती म्हणजे सुरक्षेची. १९९० मध्ये जवळपास एक लाखांहून अधिक पंडितांनी जम्मू काश्मीर सोडलं होतं. त्यापैकी अनेकांनी पुन्हा शांतता निर्माण झाल्यानं काश्मिरची वाट धरली पण आता दहशतवाद्यांच्या कारवाया सुरु झाल्यानं अनंतनागहून जम्मूला परतले आहेत. झोप उडवणारी भयंकर रात्र असं वर्णन काश्मिरी लोकांनी केलं आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं वर्चस्व? हिंदू-शिख कर्मचाऱ्यांना हवीय बदली
देशात चार दिवस पुरेल इतकाच कोळसा; अनेक राज्यांवर वीजसंकट

मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच जम्मूला येण्यासाठी निघालो. सद्भावना आणि शांतता या फक्त पोकळ चर्चेच्या गोष्टी आहेत. सुरक्षेचं कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही. जर ते शिक्षकांपर्यंत पोहचू शकतात, त्यांचं ओळखपत्र पाहून ठार करू शकतात तर मग माझ्यासारख्या काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेची खात्री कोण देईल असा प्रश्न सिद्धार्थ नावाच्या एका व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उपस्थित केला.

दुसरीकडे सुशील नावाचा एक व्यक्ती म्हणतो की, मुस्लिम सहकारी मदत करत होते, पण सरकारने हा विचार करायला हवा की अल्पसंख्याक समाजातील कर्मचाऱी अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला सुरक्षित असल्याचं मानू शकतात का? अल्पसंख्याक समुदायातील शिक्षक खोऱ्यातील दुर्गम अशा भागात काम करतात. त्यांच्याकडे जम्मूला परत येण्याशिवाय काही पर्याय आहे का?

जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान निधी अंतर्गत खोऱ्यात असलेल्या अल्पसंख्यांक कर्मचाऱ्यांना रिव्हर्स मायग्रेशनसाठी नकार देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर दिलासा आणि पुनर्वसन आयुक्त अशोक पंडिता यांनी म्हटलं की, आम्ही काश्मिर विभागीय आयुक्तांना याची माहिती दिली आहे. खोऱ्यातील सर्व उपायुक्तांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये सुरक्षित सरकारी निवासस्थानी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

सरकारकडून सुरक्षेचं आश्वासन दिलं जात असलं तरीही जम्मूला परत येणाऱ्यांची संख्या मात्र घटत चालली आहे. जम्मूतील नगरोटा इथं प्रवासी काश्मिरी पंडितांचे एक लहान गाव आहे. तिथल्या दुकान मालकाने म्हटलं की, पीएम पॅकेज अंतर्गत काश्मिरमध्ये काम करत असलेले अनेक कर्मचारी परत आले आहेत. एका दिवसात किमान ३० असे लोक मला भेटले. २ ते ३ महिन्यांनी ते खरेदीसाठी ते आले होते. त्यांनी सांगितलं की, आम्ही खोऱ्यातून पळून गेलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com