बस अपघातात सात जवानांचा मृत्यू

काश्‍मीरमध्ये बस दरीत कोसळली
Kashmir valley Seven soldiers died in bus accident
Kashmir valley Seven soldiers died in bus accident

श्रीनगर : ब्रेक निकामी झाल्याने आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या दुघटनेत ७ जवानांचा मृत्यू तर ३२ जवान जखमी झाले. ही दुर्घटना आज सकाळी ११च्या सुमारास पहेलगामजवळ घडली. या बसमध्ये एकूण ३९ जवान होते. मृतांत आयटीबीपीचे सहा आणि जम्मू आणि काश्‍मीर पोलिस खात्यातील एका जवानाचा समावेश आहे. बसमध्ये आयटीबीपीचे ३७ आणि जम्मू आणि काश्‍मीर पोलिसचे दोन जवान होते. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी श्रीनगरला एअरलिफ्ट करण्यात आले.

अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवर असणारे जवान चंदनवाडीहून पहेलगामला जात होते. आज सकाळी पहेलगामपासून १६ किलोमीटर अंतरावरील फ्रिसलान येथे बसचे ब्रेक अचानक फेल झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस रस्त्यावरून ५०० फूट खोल दरीत कोसळली. यात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जणांना रुग्णालयात मृत्यू झाला. बस कोसळल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकही दाखल झाले. गंभीर जखमी असलेल्या ६ जवानांना श्रीनगरला हेलिकॉप्टरने नेण्यात आले. उर्वरित जखमींवर अनंतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी १९ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या अपघाताबद्दल जम्मू काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोक व्यक्त केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com