esakal | हिंमत असेल तर समोर या! काश्मीरी पंडिताच्या मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

हिंमत असेल तर समोर या! काश्मीरी पंडिताच्या मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

हिंमत असेल तर समोर या! काश्मीरी पंडिताच्या मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

sakal_logo
By
विनायक होगाडे

श्रीनगर : गेल्या मंगळवारी श्रीनगरमध्ये एक प्रमुख काश्मीरी पंडीत उद्योजक मखन लाल बिंद्रु यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. त्यांची मुलीने आज माध्यमांसमोर येत रोखठोक भूमिका मांडत दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर समोर या आणि माझ्याशी चर्चा करा, असं खुलं आव्हान तिने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना दिलं आहे. "मी एका काश्मीर पंडित हिंदूची मुलगी आहे. हिंमत असेल तर समोर या" असं श्रद्धा बिंद्रू म्हणत होती. पुढे ती म्हणाली की, तुम्ही तर फक्त त्यांचं शरीर उडवलं आहे. मात्र, त्यांच्या आत्म्याला तुम्ही धक्का लावू शकत नाही. हे खूनी लोक फक्त दगड मारु शकतात किंवा पाठीमागून हल्ला करु शकतात, समोर येण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये.

हेही वाचा: वरुण गांधींची पावले बंडखोरीकडे

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी मखन लाल बिंद्रू यांच्यासमवेत तिघांची गोळी झाडून हत्या केली. बिंद्रू यांना श्रीनगरमध्ये त्यांच्या दुकानात मारण्यात आलं. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक मखन लाल बिंदरू श्रीनगरमध्ये एक मेडिकल स्टोअर चालवतात.

तिने म्हटलं की, ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी काश्मीर आणि काश्मीरियतची सेवा केली. त्यांचं शरीर आता निघून गेलं आहे मात्र त्यांची आत्मा अद्याप जिवंत आहे. गुन्हा करणाऱ्यांनी स्वत:साठी नर्काचे दरवाजे उघडले आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारु शकता, मात्र त्याच्या स्पिरीटला मारु शकत नाही. ज्यांनी माझ्या वडिलांवर गोळ्या झाडल्या आहेत, त्यांनी माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं आहे तर तुम्हाला राजकारण्यांनी बंदुक आणि दगड दिले आहेत. तुम्ही बंदूक आणि दगड घेऊन लढत आहात हाच षंढपणा आहे. सगळे राजकारणी तुमचा वापर करत आहेत. जर हिंमत असेल तर माझ्या समोर या आणि माझ्याशी चर्चा करा. मग बघू तुमच्यात किती हिंमत आहे. तुम्ही केवळ दगड मारु शकता आणि मागून गोळ्या झाडू शकता.

हेही वाचा: शेजारील देशांना लस पुरवठ्यासाठी सीरम, भारत बायोटेकला परवानगी

आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर इतक्या धाडसाने ठामपणे मत मांडणारी श्रद्धा बिंदरु सध्या नेटकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. दु:खाच्या काळात ती दाखवत असलेली हिंमत वाखाणण्याजोगी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

loading image
go to top