esakal | शेजारील देशांना लस पुरवठ्यासाठी सीरम, भारत बायोटेकला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

serum institute and bharat biotech

शेजारील देशांना लस पुरवठ्यासाठी सीरम, भारत बायोटेकला परवानगी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला परदेशात लस पुरवठा करण्यासाठी परवानगी दिली आहे. नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशला प्रत्येकी १० लाख कोविशिल्डचे डोस पुरवण्यात येणार आहेत. तर इराणला कोव्हॅक्सिनचे १० लाख डोस पुरवण्यात येणार आहेत. लसमैत्री अंतर्गत शेजारील देशांना भारत लस पुरवठा करणार आहे.

त्याचबरोबर सीरमला युकेमध्ये अॅस्ट्राजेनेकाला कोविशिल्डच्या डोस देण्यासही परवानगी देण्यात आली आहे. याची मात्रा सुमारे ३ कोटी डोस इतकी असणार आहे. सीरमचे संचालक प्रकाशकुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे याबाबत ऑगस्टमध्ये परवानगी मागितली होती.

हेही वाचा: पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी

मांडवीय यांनी २० सप्टेंबर रोजी म्हटलं होतं की, "भारत लसमैत्री कार्यक्रमांतर्गत तसेच कोवॅक्स जागतीक कार्यक्रमांतर्गत आपली प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी सन २०२१च्या चौथ्या तिमाहीत उर्वरित कोरोना लसींची निर्यात पुन्हा सुरु करेल" सीरमने कोविशिल्डच्या डोसची उत्पादन क्षमता वाढवून २० कोटी डोस प्रतिमहिना केली आहे.

हेही वाचा: केंद्रीय मंत्र्याच्या घरावर पोलिसांनी चिटकवली नोटीस

सीरमने केंद्र सरकारला सांगितलं की, "ऑक्टोबरमध्ये त्यांची लस पूर्तता क्षमता वाढून ती सुमारे २२ कोटी लस प्रति महिना होईल. दरम्यान, भारत बायोटेकही सध्या प्रत्येक महिन्याला कोव्हॅक्सिनच्या सुमारे तीन कोटी डोस तयार करत आहे. येणाऱ्या काळात याची क्षमता पाच कोटी डोस प्रतिमहिना होईल.

loading image
go to top