
काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक टेरर फंडिंग प्रकरणात दोषी
नवी दिल्ली : काश्मीरी फुटीरतावादी नेता यासीन मलिकला (Ysain Malik) दिल्ली न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात (Terror Funding Case) दोषी ठरवले आहे. एनआयने याबाबत ट्वीट केले आहे. दिल्लीच्या एका न्यायालयात यासीन मलिकने दहशतवादासाठी फडिंग काल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर आज न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले आहे. (Kashmiri Separatist Yasin Malik Convicted By Delhi Court)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिन मलिकला पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत त्याच्या आर्थिक मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 10 मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर कठोर बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत असलेल्या सर्व आरोपांसह दोषी असल्याचे कबूल केले होते.
हेही वाचा: आझम खान यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन
मलिक याच्यावर UAPA चे कलम 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), आणि 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे) आणि कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) चे आरोप ठेवण्यात आले आहेत. हे प्रकरण 2017 मध्ये काश्मीर खोऱ्यातील कथित दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित आहे.
Web Title: Kashmiri Separatist Yasin Malik Convicted By Delhi Court In Terror Funding Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..