आझम खान यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन | Bail | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Azam Khan

आझम खान यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन

लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान (Azam Khan) यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन (Interim Bail) मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयातून नियमित जामीन घेण्याचे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याशिवाय नियमित जामीन मिळेपर्यंत अंतरिम जामीन सुरू राहणार आहे. (Azam Khan News)

आझम खान 80 हून अधिक प्रकरणांमध्ये गेल्या 26 महिन्यांपासून सीतापूर कारागृहात बंद आहेत. आझम खान यांना ट्रायल कोर्टातून आतापर्यंत 88 केसेसमध्ये जामीन मिळाला आहे, मात्र 89 व्या केसमध्ये जामिनासाठी खटला सुरू होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 चा वापर करून जामीन मंजूर केला. 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात आझम खान यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेश सरकारने आझम खान यांच्या जमानत याचिकेला विरोध करत, जमीन बळकावणारा आणि गुन्हेगार म्हणून संबोधले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जमीन चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याच्या प्रकरणात आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. सध्या आझम खान यांना रामपूरच्या कोतवालीशी संबंधित आणखी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आझम खान यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी ते फेब्रुवारी 2020 पासून सीतापूर कारागृहात बंद आहे.