कठुआ सामूहिक बलात्कार ; अखेर चार महिन्यानंतर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

बकरवाल समाजातील आठ वर्षीय बालिकेचे अपहरण जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या परिसरातील राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाला हटवण्याचे हे एक कारस्थान असल्याचे सांगितले जात आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या चार महिन्यानंतर आता पोलिसांनी आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अहवाल मिळाला असून, या अहवालानुसार, या नराधमांनी पीडित बालिकेवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार केले. 

''बकरवाल समाजातील आठ वर्षीय बालिकेचे अपहरण जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या परिसरातील राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाला हटवण्याचे हे एक कारस्थान होते'', असे या घटनेतील आरोपीने सांगितले. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले, की कायदा तोडून अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच या कृत्यासह बेजबाबदार वक्तव्य करणे हे कदापिही सहन केले जाणार नाही. याप्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच याप्रकरणाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात घेण्यात येईल, असेही मुफ्ती म्हणाल्या. 

अशाप्रकारे गंभीर अपराध करणाऱयांच्या पाठिंब्यात कोण असेल. त्यांच्या सुरक्षेसाठी कोण पुढे येईल. असिफाच्या कठुआ येथे जे काही घडले यातील कोणीही निर्दोष होऊ शकत नाही. अशाप्रकारच्या गंभीर घटनेवर कोणत्याही प्रकारे राजकारण होऊ नये, असे ट्विट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले.  

Web Title: Kathua Gang Rape Case Chargesheet Reveals Minor Girl Kept Drugged Gang Raped Repeatedly