"‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तब्बल ५ कोटी जिंकलो आणि आयुष्य झाले खडतर" स्वतःच सांगतोय करोडपती सुशील कुमार..वाचा सविस्तर 

अथर्व महांकाळ 
Friday, 18 September 2020

कौन बनेगा करोडपतीमध्ये तब्बल ५ कोटी जिंकून सुशील कुमार कोट्याधीश झाला खरा मात्र त्यानंतर त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले. त्याला नंतरच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांचा सामना करावं लागला.

नागपूर : झटपट करोडपती वयाला कोणाला आवडेल? असा प्रश्न विचारला तर ९९ टक्के लोकांचे हात वर असतील यात काही शंका नाही. मात्र यापैकी अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोकं त्यांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. त्यातील एक नाव म्हणजे कौन बनेगा करोडपतीचा विजेता सुशील कुमार. पण ते म्हणतात ना श्रीमंत होणे कठीण नाही मात्र ही श्रीमंती टिकवता आली पाहिजे किंबहुना पचवता आली पाहिजे. 

कौन बनेगा करोडपतीमध्ये तब्बल ५ कोटी जिंकून सुशील कुमार कोट्याधीश झाला खरा मात्र त्यानंतर त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले. त्याला नंतरच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांचा सामना करावं लागला. तसेच अनेक वाईट प्रसंग त्याच्या आयुष्यात आले. आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्याने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. जाणून घेऊया सविस्तर.  

माध्यमांवर झाला होता नाराज 

या पोस्टमध्ये सुशीलने ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यातला एक वाईट टप्पा कसा सुरू झाला हे सांगितले आहे. सुशीलने स्वतःबद्दल असे लिहिले आहे की त्याला मद्य आणि सिगारेटचे व्यसन कसे झाले? हा सगळा घटनाक्रम सुशीलने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. सुशील म्हणाला की ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये जिंकल्यानंतर जीवन खूप कठीण झाले. तो स्थानिक सेलिब्रिटी बनला. अशा परिस्थितीत त्याला 10 ते 15 दिवसातून बिहारमध्ये कोठेतरी कार्यक्रमाला जावे लागत असे. सुशील कुमार यांचे शिक्षण पूर्णपणे थांबले. तो माध्यमांवर खूप नाराज आणि चिडला होता. फक्त लोकांना दाखविण्यासाठी त्याने एक नवीन व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसायामध्ये त्याचा खूप वाया गेला.

जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या

सिगारेट आणि दारूचे व्यसन 

या काळात त्याने काही कार विकत घेतल्या, ज्या घेऊन त्यांनी दिल्लीमध्ये ड्रायव्हिंग करण्यास सुरवात केली. दरम्यान, त्यांनी जामिया मिलिया आणि आय.आय.एम.सी.मध्ये मीडियाचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी भेटले. मग जे.एन.यू.मध्ये संशोधन करणारे लोक आणि थिएटर आर्टिस्ट अश्या लोकांशी त्याची ओळख झाली. त्यांना भेटल्यानंतर त्याला वाटलं की आपल्याला बाहेरचे जग जास्त माहिती नाही. यातच सुशीलला दारू आणि सि’गारटचे व्यसन लागले.

पत्नीशी बिघडले संबंध 

सुशील कुमार म्हणाला की पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर त्याला गुप्त दान देण्याचेही आमिष दाखवले गेले. त्याने बरीच रक्कम दान करण्यास सुरवात केली. दरम्यान, त्याला असे काही लोक भेटले ज्यांना त्याची फसवणूक करण्याची इच्छा होती. अश्या लोकांपासून सावध राहण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला सांगितले देखील होते. यामुळे पत्नीबरोबरचे त्याचे संबंधही बिघडू लागले.

चित्रपट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न 

सुशिलने सांगितले की तो आपल्या मोकळ्या वेळात हॉलिवूड आणि हिंदी चित्रपट बघायचा. ज्यामुळे त्याच्या मध्ये चित्रपट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न जागृत झाले. हे स्वप्न घेऊन त्याने मुंबई गाठली. परंतु तेथे त्याला पहिल्यांदा टीव्हीमध्ये काम करण्याची शिफारस केली गेली. त्यानंतर त्याने प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केले, पण त्याने तेही सोडून दिले. त्यानंतर सुशील कुमार बिहारला परत आला आणि शिक्षकांच्या नोकरीची तयारी केली. सुशीलने सांगितले की, तो आता एक शिक्षक आहे आणि 2016 पासून त्याने दारू पिणे सोडून दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kaun banega karodpati winner sushil kumar shared his experience