भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळला; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Kaziranga Bus Accident : जिल्हा आयुक्त बिस्वजीत फुकन यांनी या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली. बसमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
esakal

esakal

Kaziranga Bus Accident

Updated on: 

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ बस आणि कंटेनर ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगाजवळ रोंगाजान परिसरात हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...