तिसऱ्या आघाडीसाठी केसीआर यांच्या भेटीगाठी सुरु

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भाजप आणि कॉंग्रेसविरहीत प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसाठी आपण अशाच आणखी भेटी घेत राहू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हैद्राबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भाजप आणि कॉंग्रेसविरहीत प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसाठी आपण अशाच आणखी भेटी घेत राहू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेस आणि भाजपविहरित प्रादेशिक पक्षांची आघाडी बनवून लवकरच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ठोस प्लॅन' घेऊन लोकांसमोर येऊ, असाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

केसीआर यांनी काही दिवसांपूर्वी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचीही भेट घेतली होती. बसपाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही ते लवकरच भेट घेणार आहेत.

Web Title: KCR meets Mamata, says concrete plan soon