‘जीडीपी नरकात तर महागाई आकाशात; मोदी असतील तर अवघड आहे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KCRs daughter targets PM Narendra Modi

‘जीडीपी नरकात तर महागाई आकाशात; मोदी असतील तर अवघड आहे’

जीडीपी नरकात आहे तर महागाई आकाशात आहे. मोदी असेपर्यंत यात सुधारणा होणे अवघड आहे, असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी व आमदार कविता यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. के चंद्रशेखर राव यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर मुलीने हे विधान केले. (KCRs daughter targets PM Narendra Modi)

तेलंगणात २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहे. परंतु, मे २०२२ मध्येच सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले. अलीकडेच राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तेलंगणात सभा घेतल्या. दुसरीकडे केसीआर यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे नेतेही सक्रिय झाले आहेत.

‘मोदी आहे तर कठीण आहे. जीडीपी नरकात आहे तर महागाई आकाशात आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्पन्न पाताळात आहे. कारण, मोदी (Narendra Modi) आहे तर कठीण आहे’ असे व्हिडिओ ट्विटरवर शेअर करीत कविता म्हणाल्या.

हेही वाचा: मुलीच्या साक्षगंधात प्रियकराचा गोंधळ; माझ्याशी लग्न कर अन्यथा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कार्यकाळात देशातील जनता महागाईने (Inflation) त्रस्त आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. महागाई गगनाला भिडत आहे. मोदी असतील तर अवघड आहे, असे कार्यक्रमात बोलताना आमदार कविता म्हणाल्या.

Web Title: Kcrs Daughter Targets Pm Narendra Modi Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..